काळीज गलबलून गेले…आणि संकल्पनेची मेड हृदयात ठोकली..!

अशाच एका भटकंतीप्रसंगी नाशिकहून पुण्याकडे जात असतांना रस्तात निर्जल भागातून माझी गाडी ,घाट रस्ता चढत होती. रस्त्याच्या कडेने माझ्या समोरच्या दिशेने एका मागे एक चालताना आजी आजोबा दिसले,मी गाडी रस्त्याच्या बाजूला लावली आणि खाली उतरलो, माझ्या गाडीत एसी   असल्या मुळे बाहेरील उन्हाचे चटके बसले नाही, परंतु रस्त्याच्या कडेने उन्हाचे चटके सोसत, पायात बूट चप्पलही नसतांना देखिल वयोवृद्ध आजी आणि आजोबा पायंदळी चालत, वरतून सूर्याचा वानवा पेटलेल्या, रखरखत्या उन्हाचे चटके पायांन बसत,ताहानेने व्याकुळ कासावीस  झालेला त्यांचा जीव बघून मी त्यांच्या जवळ जाताच, त्या आजोबांनी “अहो’ पाणी” आहे, का..! तुमच्याकडे “मह्या’ म्हतारीला” खुप वेळची तान्हान लागली तिला “पुढ! चल! पुढ! चल” करीत इतपरींत आणलं आत्ता ती खूप थकली..! तिला चालावसं वाटत नाही, रस्त्यावर  पिण्यासाठी पाणी सुद्धा कुठही गावले नाही, आम्ही बऱ्याच गाडीवाल्यांना हात देऊन पाणी मागितले,पण घाटात कोणी थांबतच नाहीये, तुम्ही देवा सारखं  थांबलात..बघा..! मी म्हंटल बाबा तुम्ही माझ्या गाडीत आजीला घेऊन पहिले बसा, नको नको म्हणत होते, कसेबसे पाणी पिण्याच्या बहाण्याने  गाडीमध्ये बसवले, पाणी दिले दोघांनीही ढसाढसा पाणी पिले..! पाणी थोडे कमीच पडले,परंतु गाडीतील एसी चालूच असल्याने आतून गाडीत थंड गार हवा फेकत होती,त्यामुळे त्यांना ही बरे वाटू लागले, मी विचारले बाबा ऐवढ्या उन्हातान्हात कुठे निघलात..! पटकन आजी बोलल्या “मुलीकडे’ खेडला” जातोय, आजी इथून “खेड किती दूर आहे ते तुम्हाला माहिती आहे का ? नाही..ना तर मी सोडतो तुम्हाला..! पटकन आजीने तोंडातून शब्द काढले..! “आमच्याकडे’ पैस तुम्हाला” द्यायला नाहीत. मी म्हणालो काही हरकत नाही आजी..! आणि घाटातून पुढच्या दिशेने निघालो माझ्या लक्षात आले की, यांच्या सोबत  काहीतरी वाईट घडले आहे, आणि हे उपासपोटीच घरातून निघाले असतील, मला भूक नसतांना ही मुदाम  म्हंटल मला भूक लागली आहे. घाट पास करून एका धाब्यावर्ती जेवणासाठी थांबलो, आता आपण थोडं जेवण करुया..! गाडी मधील आरशात बघितले त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता बघू माझ्या लक्षात आले, त्यांनाही खूप भूक लागलेली होती. जेवण झाले गप्पागोष्टी करत होतो, मुलांनबद्दल मी चर्चा केली तर त्यांच्या दोघांच्याही डोळ्यांतून आश्रुंच्या धारा वाहू लागल्या, मला खूपच वाईट वाटायला लागले “उगाच्या उगच’ विचारले” त्यांना मी माफी मागितली परंतु त्यांनी सांगायला सुरवात केली की, सुनाने व मुलाने मारहाण केली ह्या रोजच्या भानगडीला कंटाळून घरातून निघालो ते थेट मुलीकडे खेडला..! त्यांच्या डोळ्यांतील आश्रू बघून माझंही हृदय दाटून आलं.

 असे कित्येक प्रसंग माझ्या जीवनात आले आणि अचानक वृद्धापकाळाचा विचार मनाला स्पर्शला. निराधार वृद्धांच्या हालअपेष्टांमुळे काळीज गलबलून गेले आणि एकदिवसी माझी पत्नी व मी बसून चर्चा करत होतो तेवढ्यात माझे वडिल आवाज देतात मला बाथरूमला जायचे आहे. माझ्या वडिलांना आर्धांगवायूने जखडलेले असल्याने त्यांच्या जवळ नेहमीच एक व्यक्ती जवळपास राहत असे. आम्ही सर्व नोकरी करत असल्यामुळे वडिलांना पाहिजे तसा वेळ देऊ शकत नव्हतो,वडील हे दिवस भर एकटेच असल्याने “प्रश्न सेवेचा’ निर्माण” झाला होता. त्या सेवेच्या चर्चेतून ती चर्चा निराधार वृद्धांच्या हालअपेष्टांपर्यंत जाऊन पोहोचली आणि एक ध्येय खुणावू लागले. त्यातूनच केअर घेणारे सेंटर ( वृद्धाश्रम ) उभारण्याची कल्पना पुढे आली, आणि त्याच क्षणी आयुष्याचे एक उदात्त ध्येय गवसले…याच ध्येयापोटी नाशिकमध्ये मानवांच्या हितासाठी… आणि उतरत्या वयातील सर्व सुख सुविधांयुक्त असलेलं गरजू जेष्ठ नागरिक व अंथरुणावर खिळलेल्या वयोवृदधांचे दुसरे घर निर्माण करण्याची संकल्पनेची मेड हृदयात ठोकून, आम्ही भाडेतत्वावर बंगला घेऊन २०१२मध्ये ही संकल्पना आम्ही आस्थित्वात उतरवली. संकल्पना ही आखिल मानवांच्या हितासाठी असल्याने आम्ही  वृद्धाश्रमाची ओळख हि   “मानवसेवा’ केअर सेंटर” या नावाने निर्माण केली. उदघाटन हे माझ्या आईच्याच हाताने रिबीन कापून केले. एकदिवस अगोदर न्यूज पेपर मध्ये बातमी दिल्यामुळे गरजू निराधार वयोवृद्धांनी लगेच्या लगेच प्रवेश मिळवला.

हे चालवण्यासाठी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायातील भरपूर पैसा हाताशी असल्याने ४० ते ४५ वयोवृद्धांच्या पालनाचा व सेवेचा आनंद एका बाजूने मिळू लागला…परंतु काही वर्षाने मनुष्य बळ वयोवृद्धांच्या सेवेसाठी कमी पडत असल्यानी, माझ्यावर ही मोठी जबाबदारी आली आणि ती हृदयातून स्विकारलेली असल्यामुळे मी मानवेसेवेत दंग झालो, परंतु दुसऱ्याबाजूने ट्रान्सपोर्टच्या व्यवसायावरील लक्ष हे दुर्लक्ष झाल्याने आर्थिकदृष्ट्या कुमकुवत होत जात होतो. ३ वर्ष स्वत; शी संघर्ष करत होतो परंतु मनात पेटलेली सेवेची आग ही थांबत नव्हती. गरजू वयोवृद्धांसाठी आपले काहीही देण्याची हृदयात दानत मात्र मोठी असल्याने  ट्रान्सपोर्टच्या सर्व गाड्या, प्लॉट, जे होते ते सर्व पनाशी लावले… हा वटवृक्ष जोपासण्यासाठी. धर्मदाय आयुक्तांची भेट घेऊ त्यांच्या मार्गदर्शनानुसार अखेर निधी उभारण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्ट’ची नोंदणी कृत्त असणे गरजेचे होते. आणि २०१५ मध्ये “प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशनची स्थापना झाली. ट्रस्टचा आजीव सदस्य म्हणून प्रत्येकाने सभासद शुल्क म्हणून दहा हजार रुपये दिले, आज अशाप्रकारे निधी साठत असल्याने मानवसेवा  वृद्धाश्रम ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालवले जात आहे आणि निराधारांना आधार देणारी नाशिकमधील एकमेव संस्था निर्माण झाली आहे. २०२० पर्यंत ६०० गरजूंनी “सेवा’श्रुषा घेवून आनंदाने उपभोग घेतला. आज तागायत ८० गरजूंना अहोरात्र “सेवा’श्रुषा, संस्था देत आहे.

ऑनलाईन प्रवेश सुविधा असल्याने आज नोव्हेंबर २०२१पर्यंत ४० पुरुष व १६८ स्त्रीयांसाठी प्रवेश आर्ज दाखल झाले आहेत, व तसेच रोज मानवसेवामध्ये काही गरजू येऊन केविलवाणीमध्ये आपल्या हृदय स्पर्शी भावना व्यक्त करत असतात, जागा कमी पडत असल्याने जागे अभावी प्रवेश देता येत नाही. परंतु ही खंत आमच्या मनात राहून जाते.

या मानवसेवेच्या वास्तू साकारण्यासाठी दानाशुरांची आज संस्थेला गरज आहे.

संकलन :- टी.एल.नवसागर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *