“खाकितील’ माणूसकी”,अंध व ऐकू येत नसलेल्या आजीला मिळून दिला “आश्रय”..!

“खाकितील’ माणूसकी”,अंध व ऐकू येत नसलेल्या आजीला मिळून दिला “आश्रय”..!नाशिक प्रतिनिधी : मानवांना प्रकाश,तेज,ज्ञान,प्रेरणा आणि चेतना देत राहणारी ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्या पैकी एक हे ञ्यंबकेश्वर येथील आहे.श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची रीघ लागते,या गर्दीत एक आजीबाई ञ्यंबकेश्वर पोलिस यांना रडतांना मिळाल्या त्या ताब्यात घेऊन, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.संदिप रणदिवे साहेब यांनी आजूबाजूस तपास यंञना फिरवली परंतु आजीबाईंना ओळखणारे कोणीही समोर आले नाही. उतरत्या वयात असल्यामुळे आधाराच्या काठीची गरज होती, परंतु त्या आधाराच्या काठीला जन्म देऊन भक्कम बनवले उद्या उतरत्या वयाची काठी बनेल.परंतू असे न घडता आजीबाईंच्या बोलण्यावरून ञ्यंबकेश्वर येथील भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन आजीबाईंना मंदिरा बाहेरील आवारात वाऱ्यावर सोडून दिले, याञांमध्ये बरेच असे निराधार अवस्थेत सापडून येतात.     प्रश्न पडतो अशा निराधारांसाठी शासनाने त्यांच्या उतरत्या वयामध्ये राहण्याची व गोळया औषधोपचार खाण्यापिण्याची निशुल्क सेवा’श्रुषा, व्हावेत अशी व्यवस्था केली आहे का..? काही संस्था अशा गरजूंनसाठी अहोरात्र कार्यरत आहेत,परंतु ह्या संस्था चालविण्यासाठी आर्थिक योगदान कोणाचे..! असा प्रश्न निर्माण होतो.     नाशिक जिल्ह्यात मानवसेवा वृध्दाश्रम ही एकच संस्था निःशूल्क निराधारांसाठी अहोरात्र कार्यरत आहे असे लक्षात येते, आज येथे ८४ गरजवंत वयोवृद्ध सेवा’श्रुषा घेत आहेत व  प्रवेशाच्या प्रतिक्षेत २८५ निराधार प्रवेशाची वाट बघतात. प्रश्न निर्माण होतो की,नाशिक जिल्ह्यात व तालुक्यात असंख्य आश्रमे कार्यरत आहेत,असे असतांना ञ्यंबकेश्वर पोलिस ठाण्यामार्फत एका आज्जीबाईंसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब हे मानवसेवा वृध्दाश्रम पाथर्डी फाटा नाशिक येथे त्या रस्त्यावरील आजीबाईसाठी विनंती करतात, यामध्ये मुलांमधील फरक व “खाकितील’ माणूसकी” आपल्याला दिसून येते.      आज जवळपास २० ते २५ दिवस होत आहेत आम्ही फेसबुक, व्हाॅटशाॅप, वर आज्जीबाईंचे फोटो शेअर केले परंतु त्या आजीबाईंच्या ना मुलाने किंवा मुलीनी तपास केला,परंतू आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० ते ८:००च्या दरम्यान त्रंबकेश्वर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.संदिप रणदिवे साहेब यांनी वेळातील वेळ काढून धावती का होईना मानवसेवा वृध्दाश्रमास प्रथम भेट देऊन आजीबाई ची चौकशी करून वृध्दाश्रमाची पाहणी केली.संकलन:संस्थापक अध्यक्ष.टि.एल नवसागर 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *