President T L Navsagar

नवे “बंदिस्त सोनेरी आशियाने” वृद्धांचे बनले यातनांचे माहेरघर …!

 आयुष्यभर काबाडकष्ट, जन्माला घातलेल्या मुलांकडून सोनेरी स्वप्नांची अपेक्षा, उतरत्या वयात आधाराच्या काठीची अपेक्षा, हे सर्व सोनेरी स्वप्न बघता बघता कधी उतरत्या वयात येतो त्यालाही कळतंच नसते, शरीर कमजोर होत जाते,तेव्हा आयुष्याच्या उत्तरार्धात होणारी कुचंबणा,ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन, ओढग्रस्तीने संसार करत स्वत:च्या मुलाबाळांना वाढवलं आहे…मोठं करुन स्वत:च्या पायावर उभं केलं आहे अशांच्या अनेक मुलांनी अत्यंत हुशारीने वागून त्यांना वृध्दाश्रमाचारस्ता दाखवला नाहीये, पण …

नवे “बंदिस्त सोनेरी आशियाने” वृद्धांचे बनले यातनांचे माहेरघर …! Read More »

परिसरातील जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांना मोफत गोळ्या व औषध वाटप……

          परिसरातील शेकडो जेष्ठांनी व वयोवृद्धांनी “सेवा’ पंधरवाडा” मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेत, संस्थेकडून महागडया गोळ्या औषध्ये दिल्या मोफत. प्रियदर्शनी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक व वयोवृध्द यांच्यासाठी “सेवा’ पंधरवाडा” घोषीत करून मोफत सर्व रोग निदान शिबीराचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग  नाशिक …

परिसरातील जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांना मोफत गोळ्या व औषध वाटप…… Read More »

“खाकितील’ माणूसकी”,अंध व ऐकू येत नसलेल्या आजीला मिळून दिला “आश्रय”..!

“खाकितील’ माणूसकी”,अंध व ऐकू येत नसलेल्या आजीला मिळून दिला “आश्रय”..!नाशिक प्रतिनिधी : मानवांना प्रकाश,तेज,ज्ञान,प्रेरणा आणि चेतना देत राहणारी ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्या पैकी एक हे ञ्यंबकेश्वर येथील आहे.श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची रीघ लागते,या गर्दीत एक आजीबाई ञ्यंबकेश्वर पोलिस यांना रडतांना मिळाल्या त्या ताब्यात घेऊन, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.संदिप रणदिवे साहेब यांनी आजूबाजूस …

“खाकितील’ माणूसकी”,अंध व ऐकू येत नसलेल्या आजीला मिळून दिला “आश्रय”..! Read More »

काळीज गलबलून गेले…आणि संकल्पनेची मेड हृदयात ठोकली..!

अशाच एका भटकंतीप्रसंगी नाशिकहून पुण्याकडे जात असतांना रस्तात निर्जल भागातून माझी गाडी ,घाट रस्ता चढत होती. रस्त्याच्या कडेने माझ्या समोरच्या दिशेने एका मागे एक चालताना आजी आजोबा दिसले,मी गाडी रस्त्याच्या बाजूला लावली आणि खाली उतरलो, माझ्या गाडीत एसी   असल्या मुळे बाहेरील उन्हाचे चटके बसले नाही, परंतु रस्त्याच्या कडेने उन्हाचे चटके सोसत, पायात बूट चप्पलही नसतांना …

काळीज गलबलून गेले…आणि संकल्पनेची मेड हृदयात ठोकली..! Read More »

मानसोपचारतज्ज्ञ यांनी वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांचे वाढविले मनोबल..!

मानसोपचारतज्ज्ञ यांनी वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांचे वाढविले मनोबल..! प्रतिनिधी नाशिक: दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी मानवसेवातील अबाल जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांचे मनोबल वाढवण्यासाठी सिव्हील हाॅस्पिटल नाशिक येथील, मानसोपचारतज्ज्ञ डॉ नकुल वंजारी व मानसोपचारतज्ज्ञ सोशल वर्कर मा.श्री.अरविंद पाईकराव,व तसेच परिचारिका ( नर्स ) यांना मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रमात आमंञित करण्यात आले होते.   डॉ.नकुल …

मानसोपचारतज्ज्ञ यांनी वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांचे वाढविले मनोबल..! Read More »

उतरत्या वयामध्ये मिळाली “बहिण” झाले, आनंद आश्रू अनावर…

नाशिक प्रतिनिधी :  बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन..!“मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम” परिवारातील  आजीबांईनी आपल्या सोबत आयुष्यभर राहणाऱ्या समवयस्क आजी – आजोबांच्या लडखडणाऱ्या हाताला बांधला ऋणानुबंधनाचा बहिण – भावाच्या नात्याचा रक्षाबंधनाचा धागा ! उतरत्या वयामध्ये मिळाली “बहिण” झाले, आनंद आश्रू अनावर ! रक्ताच्या नात्यातील बहिणीने फिरविली पाठ परंतु मानवसेवेच्या नात्यातून निर्माण झाली उतरत्या वयात …

उतरत्या वयामध्ये मिळाली “बहिण” झाले, आनंद आश्रू अनावर… Read More »

आनंदी जीवनाचा मार्ग …

आयुष्यभराच्या “शिदोरीसाठी,” आणि आपल्या आयुष्यभर साथ देणाऱ्या,”सोबतीसाठी” आत्ताच विचार करायला हवा …वयाच्या ४५/ ५५ / ६५ नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर..,त्यासाठी १२  नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना आमच्या मानवसेवा वृध्दाश्रमातील अनेक जेष्ठ नागरिक आणि वयोवृद्धांच्या अनुभवांच्या जीवंत गुरूकिल्लीची लिहिण्यास मला मदत  झाली आहे.यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन …

आनंदी जीवनाचा मार्ग … Read More »

“स्वातंत्र्य’ दिनानिमित्त” शहिद जवानांना वृध्दाश्रमात वाहिली भावपूर्ण आदरांजली…

“स्वातंत्र्य’ दिनानिमित्त” शहिद जवानांना वृध्दाश्रमात वाहिली भावपूर्ण आदरांजली…नाशिक  : भारत देश आज आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. संपूर्ण देशात स्वतंत्रता दिनाचा उत्साह आहे. गेली कित्येक वर्षांपासून प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणारे मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रम.  मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रमात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.  संस्थेचे संस्थापक …

“स्वातंत्र्य’ दिनानिमित्त” शहिद जवानांना वृध्दाश्रमात वाहिली भावपूर्ण आदरांजली… Read More »

अटल वयो अभ्युदय योजनेच्या अनुषंगाने साहाय्यक आयुक्तांची पाहणी …

अटल वयो अभ्युदय योजना ( जेष्ठ नागरिकांच्या  कल्याणासाठी केंद्र पुरस्कृत योजना)    अनुदानाबाबतचे प्रस्तावाची मागणी … प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन संचलित मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रम या संस्थेस,समाज कल्याण विभाग नाशिकचे, सहाय्यक आयुक्त मा.श्री. सुंदरसिंग वसावे साहेब यांनी भेट दिली.      पालक व जेष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण अधिनियम २००७ मधील कलम १९ व २० …

अटल वयो अभ्युदय योजनेच्या अनुषंगाने साहाय्यक आयुक्तांची पाहणी … Read More »

वृक्षारोपणाची घेतली शपथ…

वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक यांनी वृक्षारोपणाची घेतली शपथ…वृक्ष असतील तर वसुंधरा असेल आणि वसुंधरा असेल तरच मानव असेल . म्हणूनच या पर्यावरण दिनानिमित्त प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन ह्या संस्थेच्या माध्यमातून मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम तर्फे वसुंधरा संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले .या वृक्षारोपणाच्या छोट्या-खाणी कार्यक्रमांमध्ये वृद्धाश्रमातील आबालवृद्धांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.   जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशामध्ये …

वृक्षारोपणाची घेतली शपथ… Read More »