अटल वयो अभ्युदय योजनेच्या अनुषंगाने साहाय्यक आयुक्तांची पाहणी …

 अटल वयो अभ्युदय योजना ( जेष्ठ नागरिकांच्या  कल्याणासाठी केंद्र पुरस्कृत योजना) 
   अनुदानाबाबतचे प्रस्तावाची मागणी ...

प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन संचलित मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रम या संस्थेस,समाज कल्याण विभाग नाशिकचे, सहाय्यक आयुक्त मा.श्री. सुंदरसिंग वसावे साहेब यांनी भेट दिली.
     पालक व जेष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण अधिनियम २००७ मधील कलम १९ व २० मधील तरतुदीच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरिकांच्या कल्याणासाठी अटल वयो अभ्युदय योजना सुरू केली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नाशिकमधील वृध्दाश्रमांचे सर्वेक्षण होणे अपेक्षित असल्याने. त्या अनुषंगाने जेष्ठ नागरिकांसाठी अहोरात्र कार्यरत असलेले मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रम या संस्थेतील जेष्ठांची प्रत्येक्षात पाहणी करून येथील उपक्रमाची माहिती घेत, सर्व उपस्थित कर्मचारीवर्गाचे स्थानिक प्रशिक्षणाबद्दल माहिती घेत,मेडिकल स्टाफची पाहणी केली.
  येथील सुविधा जाणून घेत, उर्जा सोलर वॉटर हिटर व इलेक्ट्रिक वॉटर हिटर, व तसेच शुध्द पाण्याचे मशीन, स्वयंपाक घर, मनोरंजन हाॅल, भोजन गृह व पुरेसा असलेला मोकळा परिसर या सर्व सुख सुविधांची पाहणी केली व मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमाला उत्कृष्ट दर्जा दिला.
हे विनाआनुदानीत चालवत असल्याने, त्यांच्या लक्षात आले की, जर केद्र सरकारने या साठी आर्थिक मदत केली तर हि संस्था आजूनही मोठ्या प्रमाणात सुविधा जास्तीत जास्त पुरवेल असे साहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे साहेब यांना वाटत होते, कारण ह्या संस्थेला महिन्याला एक लाख नव्वद हजार जवळपास खर्च येतो असे संस्थेचे संस्थापक नवसागर सर माहिती देतांना बोलत होते.
या वेळी प्रत्येक्षात साहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नाशिकचे मा.श्री. सुंदरसिंग वसावे सर व कनिष्ठ लिपिक समाज कल्याण विभागाचे श्री. शांतीलाल सावकार हे सुध्दा सोबत होते. 
                     
                                               संकलन : श्री.टी एल नवसागर 
                            प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फौंडेशन संचालित मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम.
  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *