परिसरातील शेकडो जेष्ठांनी व वयोवृद्धांनी “सेवा’ पंधरवाडा” मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेत, संस्थेकडून महागडया गोळ्या औषध्ये दिल्या मोफत.
प्रियदर्शनी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक व वयोवृध्द यांच्यासाठी “सेवा’ पंधरवाडा” घोषीत करून मोफत सर्व रोग निदान शिबीराचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नाशिक मा. श्री सुंदरसिंग वसावे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रथम महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री टी एल नवसागर सर यांचे हस्ते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नाशिकचे,मा.श्री. सुंदरसिंग वसावे साहेब यांना शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिकचे तज्ज्ञ डॉ. मंगेश चौधरी यांचे स्वागत हे संस्थेचे पदाधिकारी श्री.भगवान सावंत यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिकचे तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश राठोड,यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम च्या संचालिका सौ ललिता ताई नवसागर यांचे हस्ते जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक तज्ज्ञ डॉ. स्नेहल वाघ, तज्ज्ञ डॉ. मधुरा धारणे, परिचारिका सोनीका नेरकर यांचेही शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच समाज कल्याणचे कनिष्ठ लिपिक श्री शांतीलाल सावकार,समाज सेवक आयुष्यमान भाऊराव वानखेडे यांचे हि या वेळी स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त श्री सुंदर सिंग वसावे यांनी सांगितले की, प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवाडा घोषीत करून ज्येष्ठ नागरिक, वयोवृध्द यांच्यासाठी मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.. ह्या ठिकाणी प्रत्येक वेळी असे सामाजिक शैक्षणिक तसेच आरोग्य शिबिराचे संस्थेकडून आयोजन करण्यात येते. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथून आलेल्या डॉ. च्या टीमने येथील मानवसेवा वृद्धाश्रमातील ८० ते ८२ वयोवृद्ध यांची आरोग्य तपासणी त्यांच्या बेडवरती करण्यात आली तसेच संस्थेकडून आरोग्य शिबिराचा लाभ घेणाऱ्या सर्व जेष्ठांना व वयोवृद्धांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या मध्ये परिसरातील शेकडो जेष्ठ नागरिक व वयोवृद्धांनी लाभ घेतला मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम पाथर्डी संचालक संस्थापक आयुष्यमान टी एल नवसागर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.