वृक्षारोपणाची घेतली शपथ…

वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक यांनी वृक्षारोपणाची घेतली शपथ…
वृक्ष असतील तर वसुंधरा असेल आणि वसुंधरा असेल तरच मानव असेल . म्हणूनच या पर्यावरण दिनानिमित्त प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन ह्या संस्थेच्या माध्यमातून मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम तर्फे वसुंधरा संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले .या वृक्षारोपणाच्या छोट्या-खाणी कार्यक्रमांमध्ये वृद्धाश्रमातील आबालवृद्धांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
   जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे. म्हणून प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून, जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा २०२१ च्या कोरोना व्हायरस महामारीत पडलेला ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता, कोरोना महामारीच्या विळख्यात सापडून,ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक मृत्यूमुखी पडले, हवामानातील बदल आणि वातावरणातील कार्बनडाॅयऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्याने याविषयीची दखल घेऊन संस्था आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हि संकल्पना राबविण्याचे काम संस्था करत आहे,”एक मुल’ एक झाड” आणि ते झाड मुलांप्रमाणे पालकत्व घेऊन झाडाला आयुष्यभर जोपासण्याचे काम केले पाहिजेत हे काम आज मानवसेवातील जेष्ठ नागरिक व वयोवृद्धांनी उत्स्फूर्त पणे स्विकारले.
आपल्या मुलांनप्रमाणे त्या झाडाला वाढविण्याची शपथ विश्व पर्यावरण दिनानिमित्त आज ५ जुन  २०२१ रोजी मानवसेवा वृध्दाश्रमातील आवारात सर्वांनीच एक साथ घेतली.
  या वेळेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.टि.एल नवसागर सर पुढे बोलतात की, पर्यावरण संतूलीत ठेवण्यासाठी वृध्दाश्रमातील अबालवृद्ध नागरिक पुढे सरसावून वृक्षारोपण करून आपल्या मुलांप्रमाणेच सांभाळण्याची शपथ त्यांनी आज घेतली आहे. आपणही शपथ घेऊ आणि या जेष्ठ नागरिकांचा आदर्श ठेवून  जगातील प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाडे लावून झाडे जोपासले तर नक्कीच वाढते कार्बन डाॅयऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्‍या क्लोरे-फ्लुरो कार्बन वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन केल्यास प्रदूषित वातावरणाला मुठ माती मिळेल.
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, !!! मानवसेवा हीच ईश्वर सेवा … वृक्षसेवा हीच मानवसेवा ।।।

     ‐——‐————————————————-
संकल्प. प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *