“स्वातंत्र्य’ दिनानिमित्त” शहिद जवानांना वृध्दाश्रमात वाहिली भावपूर्ण आदरांजली…
नाशिक : भारत देश आज आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. संपूर्ण देशात स्वतंत्रता दिनाचा उत्साह आहे. गेली कित्येक वर्षांपासून प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणारे मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रम.
मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रमात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.टि.एल नवसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांनी राष्ट्रगीत गायले, आलेल्या पाहुण्याच्या हस्ते दिप प्रज्वल करून, महापुरुष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री.भाऊराव वानखेडे तसेच गजानन महाराज मंदिर प्रशांत नगरचे विश्वस्त मा.श्री.सुभाष महाले, मा.श्री.कैलास धांडे व सामाजिक कार्यकर्ते, बहुजन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.संतोष भाऊ आडांगळे, मानवसेवा वृध्दाश्रमास सेवाभाव करणारे मा.श्री. डाॅ. मंगेश चौधरी. म.न.पा.आभियंता. मा.श्री.गौतम हांडगे, आदिवासी समाज बांधवांच्या हक्कांसाठी व समाजहितासाठी झटणारे मानवता ग्रुप गणराज काॅलनी चे मा.श्री.संजय शिंदे हे उपस्थित होते.
यावेळी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन संचलित मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रम या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.टि.एल नवसागर, उपाध्यक्ष.श्री. रमेश घनसावंत, सचिव. श्री. सुभाष सावंत, खजिनदार. सौ. ललिता टि.नवसागर,
सदस्य. श्री. भगवान सावंत, श्री.दत्तराव सावंत, यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मानवसेवातील अबाल जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांनी सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला.
या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहीद जवानांना मानवसेवातील अबाल जेष्ठ नागरिक व वयोवृद्धांनी आपल्या लडखडत्या पायावर दोन मिनिटे उभे राहून भावपूर्ण आदरांजली वाहून कार्यक्रमाची सांगता मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रम च्या संचालिका सौ.ललिता नवसागर यांनी आलेल्या पाहुण्यांचे व वृध्दाश्रमातील जेष्ठांचे आभार मानुन हा कार्यक्रम संपन्न केला.
“स्वातंत्र्य’ दिनानिमित्त” शहिद जवानांना वृध्दाश्रमात वाहिली भावपूर्ण आदरांजली…
