आयुष्यभराच्या “शिदोरीसाठी,” आणि आपल्या आयुष्यभर साथ देणाऱ्या,”सोबतीसाठी” आत्ताच विचार करायला हवा …
वयाच्या ४५/ ५५ / ६५ नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर..,
त्यासाठी १२ नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना आमच्या मानवसेवा वृध्दाश्रमातील अनेक जेष्ठ नागरिक आणि वयोवृद्धांच्या अनुभवांच्या जीवंत गुरूकिल्लीची लिहिण्यास मला मदत झाली आहे.यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील.
हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.
१) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. हे पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याऐवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.
धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल पुरूप’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.
२) तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.
३) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल ऐवढाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.
४) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.
५) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणाऱ्या आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील.
६) तुमचे वय काहीही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.
७) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तोअंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.
८) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.
९) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.
१०) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.
११) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.
१२) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व केअरफूल माणसेच लोकांना नेहमीच आवडतात.
यासाठी सुखी रहावेत आनंदी राहावेत दुसर्यांना आपल्या सुखात सहभागी करावेत
दुसर्याच्या दुःखात सहभाग नोंदवून गरजवंताला मदतीचा हात द्यावेत.
“मानव ‘सेवा” हिच ईश्वर सेवा, ही हृदयात ठेवून गरीबांना मदत करा ते सुखी होतील गरिब गरिब रहाणार नाही.
जेष्ठ नागरिक आणि वयोवृद्धांनी आता “जागृत” होण्याची गरज आहे.
कारण अशा लोकांना शासनाची पेन्शन असून देखिल उतरत्या वयात त्याचेच नातेवाईक त्याला सांभाळण्यास तयार होत नाहीत.
काही तर जेष्ठ नागरिक स्वतावर निर्भर असतात, त्यांच्याकडे बंगले, मोटार गाड्या, नोकर, चाकर असतात.
तरी देखील ते वृध्दाश्रमात राहतात, त्याचे कारण एक असू शकेल,त्याने कमवलेल्या धनाची किंमत त्यांच्या मुलांच्या पुढे कवडीमोल असू शकते किंवा त्याने आपल्या मुलांना चांगले संस्कार घडविले नसतील किंवा त्याचे मुले हे वरवरचे त्यांचे परी प्रेम दाखवून त्यांची दिशाभुल करून वृध्दाश्रमाकडे जाण्यास मजबूर करीत असतील, यासाठी अनेक कारणे असू शकतात.
या धावपळीच्या दुनियेत मनुष्यबळ कमी असल्याचा दावा करणे, त्यांना त्यांच्या आयुष्यातून बाहेर काढून टाकायचे असते. कारण हे एकच असू शकते की, म्हातारपण हेच घरातील “अडगळ” आहे.
काही विचारवंतांची त्यावेळची परिचिती समोर आली. विचार न करता आयुष्याची माया पुंजी ही संपूर्ण कमवलेले संपत्ती मुलांच्या नावे करून देऊन, काही दिवसात त्यांना मारहाण करून घराबाहेर काढल्याची परिचिती लक्षात आलेली आहे,अशा व्यक्तीस नातेवाईक सुध्दा साहारा देत नाहीत असे दारोदारच्या ठोकरा खात फिरतात आणि एक दिवस नाइलाजाने वृध्दाश्रमाचे दरवाजे ठोठावतात.
अशा व्यक्तींनी कधीच वृध्दाश्रमाला मदत किंवा आर्थिक स्वरूपात दान दिलेले नसते.
काही महाशय असे देखिल असतात, उर्वरित आयुष्य हे वृध्दाश्रमात घालण्यासाठी जातात. त्यांनी ऐवढे कमवून ठेवलेले असते की,मुलांचे, मुले सुध्दा न काम करता बसून जीवन जगून त्यांची सेवा करू शकतात.
परंतू हे असे होत नाही, कारण त्यांच्या जवळ त्यांच्या आई वडीलांची कवडीमोल किमत होते. त्यांचे मुले सुद्धा पैशाच्या मागे धावून आपले आस्तित्व निर्माण करतात आणि भडगंज संपतीचा साठा करतात.
कारण असे अनेक लोक असतात की,आपला व आपल्याच मुलांचाच विचार करतात.
अशा लोकांना कधीच दानधर्म माहीती नसतो. असे लोक पुण्य कर्माकडे न जाता हे अंधश्रद्धेकडे जातात आणि हळू हळू पाप कर्मात डुबतात.
अशा लोकांना आपल्याकडील भडगंज संपती चा उपभोग घेता येत नाही.
यांच्या मागे दुख लागतात,हाॅस्पिटल, गोळ्या औषधोपचार करुनही देखिल उपयोग होत नाही. शेवटी पैसाही कामी येत नाही.माझे माझं म्हणून सर्व कमवलेले सोडून जावे लागते. मेल्यावर त्याचे नातेवाईक एक दोन दिवसात त्याला त्याचे नातेवाईक विसरून जातात. अशा लोकांचे अस्तित्व काय “आला हेला’ आणि “ओझे वाहून’ मेला” अशी गत होते.
सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपल्या जोडीदाराचा विचार केला पाहिजे. दोघांच्या आयुष्यभर पुरेल एवढीच संपती जवळपास ठेवली पाहिजे. उर्वरित संपती मानव’ सेवे च्याच हितासाठीच दानधर्म केली पाहिजे.
असे केल्यास आपण काही तरी समाजातील गरजुंच्या उपयोगी पडलो,हे मनाला समाधान लाभते आणि सामाजिक बांधिलकी,जपल्यामुळे दान स्वरूपात घेणाऱ्या संस्थेला बळकटी निर्माण होईल आणि अशा संस्था अधिका अधिक मानव सेवेचे काम करतील, तुमचे नाव हे अजरामर होईल. आपल्या मुलांनाही मोकळ्या जीवनाचा आनंद घेऊ द्या! आणि तुम्ही उतरत्या वयासाठी ठेवलेली रक्कम बँकेत जमा करा व त्या पैशातून जीवनाचा बसून उपभोग घ्यावेत.
घरात काळजी घेण्यासाठी नसेल किंवा असूनदेखील दुर्लक्षित करीत असतील तर कसलाही विचार न करता, आपल्याकडील संपती किंवा आर्थिक स्वरूपात डोनेशन देऊन हक्काचे दुसरे घर म्हणून वृध्दाश्रमाचा स्विकार करावा.
संकल्पना : टि.एल नवसागर.