मानसोपचारतज्ज्ञ यांनी वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांचे वाढविले मनोबल..!
प्रतिनिधी नाशिक: दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी मानवसेवातील अबाल जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांचे मनोबल वाढवण्यासाठी सिव्हील हाॅस्पिटल नाशिक येथील, मानसोपचारतज्ज्ञ डॉ नकुल वंजारी व मानसोपचारतज्ज्ञ सोशल वर्कर मा.श्री.अरविंद पाईकराव,व तसेच परिचारिका ( नर्स ) यांना मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रमात आमंञित करण्यात आले होते.
डॉ.नकुल वंजारी यांचे स्वागत संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा.श्री.टि.एल नवसागर सर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी सिव्हील हाॅस्पिटल नाशिक येथील डाॅ. मानसोपचारतज्ज्ञ, कर्मचारीवर्ग यांनी मानवसेवा केअर सेंटर ची पाहणी केली.
दिवसेंदिवस जेष्ठ नागरिक व वयोवृद्धांमधील वाढता चिडचिडपणा व उतरत्या वयातील वाढत्या समस्यां आणि समाजातील वाढत्या आत्महत्या तसेच मानसिक आजारांचे वाढते प्रमाण आहे. २१ व्या शतकातला सर्वांत मोठा आजार म्हणून मानसिक आजार असल्याचं अनेक जाणकार आणि तज्ज्ञांनी सांगितलं.
अनुवांशिक असो किंवा परिस्थितीजन्य कारणं असो अशा रुग्णांना आळा घालण्यासाठी प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन संचलित मानवसेवा केअर सेंटर हे आधार व मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला,उपचार देण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे.
मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार कसे केले जातात याविषयी जाणून घेण्यासाठी डॉ. नकुल वंजारी यांना या विषयावर जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांना प्रबोधन करण्यास विनंती केली.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ नकुल वंजारी यांनी मानसोपचारामध्ये एम.बी.बी.एस./ एम.डी. हि पदवी प्राप्त केलेली आहे.
या धावपळीच्या दुनियेत आपल्या पाल्याने वृध्दाश्रमात ठेवले असे वाटत असेल तर असे वाटू देऊ नका कारण वाढती महागाई उतरत्या वयात आपल्याला साहार्याची गरज भासत असते व चार भिंतीत आयुष्य व्यथित करण्या पेक्षा आपल्याच वयातील समवयस्क नव नवीन मिञांसोबत उर्वरीत आयुष्य आनंदात घातले पाहिजे,असे ते बोलत असतांना त्यांनी प्रभूराम व सिता यांचे हे अरण्यवनात राहीले,आपण तर मणुष्य आहोत,असे बोलून जेष्ठांचे व वयोवृद्धांचे मनोबल वाढविले, पुढे बोलतात
मानसिक आजार झालेल्या कुटूंबातील सहकारी, नातेवाईक, मित्र, शेजारी यांनी रुग्णांचे लक्षणं ओळखून मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्यास नक्कीच फायदा होईल. जेष्ठ नागरिक व वयोवृद्धांचे उतरत्या वयातील चिडचिड पणा, वृध्दाश्रमात टाकून दिले असे मनात विचार येणे, वाढत्या ताणतणावाखाली येऊन आत्महत्या करण्याऱ्यांचं प्रमाण कमी होईल असे ते बोलत होते.
सिव्हील हाॅस्पिटल नाशिक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात असे बोलत मानवसेवाच्या संचालिका सौ ललिता नवसागर यांनी आभार व्यक्त केले.